Thoughts

Saturday 18 November 2017

आयुष्य !!









आयुष्य !! 

ज्याची त्याची जगण्याची पद्धत वेगळी,ज्याचे त्याचे महत्व वेगळे, काही जण असंख्य ओझे घेऊन जगतात तर काही त्या ओझ्याना वाट दाखवत. आयुष्यातील प्रत्येक क्षण ज्याला जगता येतो ना तो कसल्याही संकटाला पुरून उरण्याची ताकद ठेवतो असं मला वाटतं. हे आयुष्य जगताना अनुभव नावाची गोष्ट अत्यंत उपयोगी आहे. जे लोक आपले आवडते काम मन लावून करतात किंवा मनापासून ते जगतात काम करताना ते खूप भाग्यवान असतात. 





आयुष्यात तेव्हा भावनिक करतो जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावरून अनवाणी पावलांनी फिरणं असो, किंवा एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीवर बसून समोरच जग पाहणं असो, किंवा एक परफेक्ट फोटो मिळल्यावरच समाधान असो, किंवा स्वतःच्या गाडीवर एकटच विचार करत चालण असो, किंवा गुलजारसाहेबांची शायरी असो, किंवा चंद्रशेखर गोखलेकाकांची चारोळी असो, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनामिक सुख देतात.
आयुष्यच्या धावपळीत भरपूर जण आपले छंद, आपले कौशल्य काळाच्या ओघात विसरून जातात आणि अचानक त्यातली एखादी गोष्ट समोर आली की मंग त्या जगलेल्या आठवणी अगदी मिठाई सारख्या एका मागे एक येत जातात,अगदी सौमित्र यांच्या "आठवण आठवण आठवणींची लांबच लांब रांग " असे म्हणत.
संकट ही अशी गोष्ट आहे जी कधीच आपली पाठ सोडणार नाही. मंग ते संकट कसेही असो त्यावर मात करायला हवंय. असे असंख्य लोक असतात ज्यांना या सुंदर अश्या आयुष्याची किमंत कळालीच नसते. हे आयुष्य सहज मिळालेलं नाहीय. हातपाय गाळून पडतात आपलं आयुष्य आता काहीच उरलं नाही असं विचार करतात, खरं तर अश्या माणसांवर कीव येते.


भरपूर लोक पावला पावली भेटतात म्हणतात हे फेसबुक वैगैरे फार वाईट आहे लोक बिघडवून ठेवते लोकांना, पण खरं तर हे आपण कसं ते वापरतो या वर अवलंबून आहे. मला तर ह्या फेसबुक पासून खूप काही मिळालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आणि त्या बाहेरील लोक जोडल्या गेलेत. ह्या माध्यमातून खूप सारे जिवलग मित्र मिळालेत. ह्यांच्या सोबत खूप फिरलोय.ह्या मित्रांकडून रोज काहींना काही शिकत असतो आणि नवीन गोष्टी करण्याची उमेद पण घेत असतो. इतिहास,आयुष्यातले अनुभव,पुस्तकं, फोटोग्राफी, अपिरिचित माहीत अश्या खूप गोष्टी आहेत जे हे प्रत्येक क्षण जगतात आणि लोकांना न कळतं ते शिकवत जातात.

शेवटी आयुष्य खूप सुंदर आहे असे सगळेच जण म्हणतात, फक्त ज्याला त्याला मनासारखं जगता आलं पाहिजे..









No comments:

Post a Comment